भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल 1929 रोजी सेंट्रल लेजिस्लेटिव असेम्बली (कायदेमंडळ) मधे बॉम्ब फोडला.
त्या दिवशी नेमके काय घडले?बॉम्ब फोडण्यामागे नेमके काय कारण होते?त्यातून काय साध्य झाले?शेवटी,इतरांप्रमाणे बॉम्ब फोडल्यावर भगतसिंग पळून का गेले नाहीत?आत्मसमर्पण करुन त्यांनी काय साध्य केले?
भारतात स्वातंत्र मिळवण्यासाठी अनेक चळवळी झाल्या.त्यातील एक मुख्य म्हणजे क्रांतिकारी चळवळ.गदर असो या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन..क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता स्वातंत्र मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले.पण त्यांनी केलेले काम,त्यांची पूर्वतयारी त्यांना अतिशय गुप्तरित्या करावी लागे.घरच्यांपासून,समाजापासून लपून,कसाबसा आर्थिक डोलारा सांभाळत ते आपले कार्य पूर्ण करत.क्रांतिकारकांना असणारी सर्वात मोठी अडचन म्हणजे पैसा..!!कारण क्रांतिकारक म्हणजे सशस्त्र क्रांति.
आर.एच.तावनी यांच्या ‘द अक्विज़िटिव सोसायटी’ या पुस्तकात त्यांनी म्हणले होते,की राजकीय स्वातंत्र्यापेक्षा मानवाला आर्थिक स्वातंत्र अधिक महत्वाचे..!!कोणत्याही समाजाचा इतिहास हा त्याच्या समाजातील वर्गसंघर्षाचा इतिहास असतो.
क्रांतिकारकांना सुद्धा नेमके हेच वाटत असे.’सर्वांना समान आर्थिक अधिकार’ या तत्वावर भगतसिंग आणि कम्युनिस्ट लोकांचा पूर्ण विश्वास होता.
क्रान्तिकारकांच्या समोर असणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे त्यांच्या कामासाठी कमी पडनारा पैसा.यातून ते कधीकधी श्रीमंत पण ‘अन्यायी’ लोकांच्या घरी लूट करीत असत.लोकांच्या मनात त्यांच्याविषयी अनिश्चिततेची भावना होई.आणि इंग्रज सरकार ही या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांना बदनाम करत असे.यातूनच क्रांतिकारक ‘दहशतवादी’,’मारेकारी’ म्हणून संबोधल्या गेले.
त्यात क्रांतिकारकांनी हिंसाचार केला,देशाचे नुकसान केले असे अनेक आरोप लागल्या गेले.आपले कार्य देशासाठीच असून,देशाच्या स्वातंत्र्यासाठी असून,देशाविरोधी नाही हे सर्वांना समजावून सांगायची वेळ आली आहे,असे भगतसिंग यांना वाटू लागले.
याआधी सुद्धा क्रान्तिकारकांवर होणाऱ्या ‘दरोडेखोरीच्या’ आरोपांना पूर्णविराम मिळावा पण आपल्या आर्थिक प्रशांचा निकाल लागावा म्हणून ‘काकोरी’ सारख्या घटना घडल्या.सॉण्डर्स मर्डर केस चा सुद्धा हवा तसा परिणाम झाला नाही.त्यातच गांधीजींनी ‘बेजबाबदार युवक’ या शब्दात केलेली संभावना त्यांच्या जीवावर लागली होती.
जुलमी ब्रिटिश सत्तेला देशातून घालवुन देने आणि शेतकरी कामगार आणि तरुण यांना एकत्र घेऊन व्यापक चळवळ उभारने हेच या क्रांतिकारकांचे मुख्य उद्दिष्ट होते.या दोन गोष्टीमुळे आपण स्वतंत्र अधिक जवळ आणु हा त्यांचा विश्वास होता.
आणि आपले तत्व,आवले मार्ग लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांना ज्या मार्गाची आवश्यकता होती,तो मार्ग त्यांना स्वतःला आत्मसमर्पण करुन मिळणार होता….
कोर्टात त्यांच्यावर केस चालवल्या जाईल,त्यांचे वाद-प्रतिवाद मांडले जातील,त्यांचे स्टेटमेंट कोर्टाला नोंद करावे लागतील,पेपरमधून त्यांचे विचार,त्यांचा संदेश घरोघरी पोहोचेल,आणि त्यांना जे हवे ते साध्य होईल,आणि तरुण सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबून स्वातंत्र मिळवतील..याच भावनेतून भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी आत्मसमर्पण केले.
कुठल्याही भरकटलेल्या मार्गावरून चालनारे नसून,क्रांतिकारक हे देशाला स्वतंत्र मिळवून देणाऱ्या आदर्श,पण सशस्त्र मार्गावरून चालनारी तरुणांची एक ‘फौज’ आहे असे भगतसिंग म्हणत.
त्यांनी बॉम्ब फेकल्यावर भिरकावलेल्या पत्रकात म्हणले होते,की आम्हाला आक्रमणकारी आणि देशासाठी अपमानकारक म्हणले आहे,उन्मत्त म्हणले आहे पण ते तितके खरे नाही.
बॉम्ब फेकल्यावर लार्ड इयरविन म्हणाला,बॉम्ब हल्ला हा व्यक्तीवेचक नसून,तो संसदेवर पर्यायाने संविधानावर केलेला हल्ला आहे,असे त्यांच्या कृत्यातून दिसून येते..यातच त्यांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन झाले.
आत्मसमर्पण न करताही त्यांना आपला लढा पुढे चालू ठेवता आला असता,पण त्यांनी केलेले कार्य आणि त्यांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन,महत्त्व आपणास समजले नसते.
1930 पर्यंत जी वर्तमानपत्रे आणि जे भारतीय लोक भगतसिंग आणि क्रान्तिकारकांकड़े गांधीविरोधी,देश विरोधी म्हणून पाहत होते,यांच्यामुळेच आपले स्वातंत्र मिलन्यास अडचन येईल असे ज्यांचे मत होते,तेच लोक,तीच वर्तमानपत्रे मात्र नंतर 2 वर्षे भगतसिंग आणि क्रांतिकारकांच्या मार्गाचे समर्थन करत होते.क्रांतीच्या मार्गाशीवाय आपल्याला स्वातंत्र मिळणार नाही,एवढी प्रखर भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली होती.
आणि केवळ याच गोष्टीसाठी,भगतसिंग यांनी आपले बलिदान दिले होते.त्यांना जे हवे होते,त्यांनी ते साध्य केले.त्यासाठी त्यांनी दिलेले आपल्या प्राणांची आहुती अनमोल आहे.
भगतसिंग अजुन जगले असते तर….त्यापेक्षा त्यांच्या बलिदानामुळे समाजात स्वातंत्र्याविषयीची भावना अधिक प्रखर झाली.त्यांनी या देशासाठी प्राण दिला तरच त्यांना जे हवे ते साध्य होईल,याची त्यांना पुरेपूर जाणीव होती.
शेवटी,
“क्रांती की इस वेदी पर हम अपना यौवन धूपबत्ती की भांति जलाने के लिए संबद्ध हुआ है,इस महान ध्येय के लिए कोई भी बलिदान बडा नहीं.”
हे वाक्य या क्रांतीकारकांनी खरे करुन दाखवले.
केतन पुरी